file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर परिसरातील रेल्वे रुळावर रेल्वेची धडक बसल्याने महिला श्रीमती सुनिता संतोष सौदागर,वय 40 वर्ष,राहणार -भीम नगर, वार्ड नंबर 6,श्रीरामपूर या महिलेचा मृत्यू झाला आहे.

रेल्वेची धडक बसल्यानंतर सुनीता यांना श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

परंतु तेथील डॉक्टरांनी सुनीता या मयत झाल्याचे श्रीरामपूर शहर पोलिसांना सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहेत.