अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- अहमदनगर शहरात गळफास लावून घेत तरूणाने आत्महत्या केली. गौतम ज्ञानदेव कापडे (वय ३२ रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

बोल्हेगाव उपनगरात आज सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आला आहे. गौतम याने शेतामधील कांदा शेडमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

गौतम याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच गौतमच्या नातेवाईक,

मित्रांनी जिल्हा रुग्णालय धाव घेतली असून गौतमचे शवविच्छेदन सुरू आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.