Ahmednagar News:अहमदनगर शहरातील उड्डाणपूलावर शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चित्र रेखाटावेत व उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे रघुनाथ आंबेडकर यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.

शहरातील उड्डाणपुलाचे काम खासदार डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने प्रगतीपथावर असून, उड्डाणपुलाच्या खांबावर शिवचित्र सृष्टी रेखाटण्याचे काम सुरू आहे.

उड्डाणपुलावर शिवचित्रसृष्टी रेखाटत असताना त्यासोबत प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चित्र जनतेला प्रेरणादायी ठरतील.

या उड्डाणपुलाच्या कामाकरिता स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या स्वप्नातील उड्डाणपूलाचे काम पूर्णत्वाला जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

उड्डाणपूलावर शिवचित्र सृष्टी रेखाटत असतानाश्री प्रभू रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटावे व स्वर्गीय नेते माजी खासदार दिलीप गांधी यांचे नाव उड्डाणपूला देण्याची मागणी भाजप कामगार आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.