file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-अहमदनगर: जिल्ह्यात आज ८८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १६ हजार ४३ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६५८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३१६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३०९ आणि अँटीजेन चाचणीत २५० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले १३, जामखेड १२, कर्जत ०३, नगर ग्रामीण १८, नेवासा ०१, पारनेर ६२,

पाथर्डी ११, राहता ०४, राहुरी ०२, संगमनेर १२९, शेवगाव ०२, श्रीगोंदा ४०, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, अकोले १३, जामखेड ०१, कर्जत ०७, कोपरगाव २१,

नगर ग्रा.१३, नेवासा २४, पारनेर ४६, पाथर्डी ०७, राहाता ०९, राहुरी २२, संगमनेर ५०, शेवगाव ३५, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर २७ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २५० जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले २९, जामखेड ०९, कर्जत ५४, कोपरगाव २०,

नगर ग्रा. ०५, नेवासा २५, पारनेर ३२, पाथर्डी १६, राहाता ०४, राहुरी ०९, संगमनेर १५, शेवगाव ०१, श्रीगोंदा २७, श्रीरामपुर ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, अकोले ६२, जामखेड ३४, कर्जत ५७, कोपरगाव ०६, नगर ग्रा. ४३,

नेवासा २५, पारनेर ९३, पाथर्डी ७४, राहाता १५, राहुरी ३६, संगमनेर १९६, शेवगाव ५६, श्रीगोंदा १११, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०६ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,१६,०४३

उपचार सुरू असलेले रूग्ण:५६५८

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६५९०

एकूण रूग्ण संख्या:३,२८,२९१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)