file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ८२६ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३२७ आणि अँटीजेन चाचणीत २३७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, जामखेड ०२, कर्जत ०४, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०१, पारनेर १२, पाथर्डी ३१, संगमनेर ५१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ४२, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, अकोले ०७, जामखेड ०५, कर्जत २५, कोपरगाव ०२, नगर ग्रा.३३, नेवासा ०४, पारनेर २३, पाथर्डी १४, राहाता २७, राहुरी ०९, संगमनेर ९५, शेवगाव २२, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २३७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले १५, जामखेड ०६, कर्जत २०, कोपरगाव २७, नगर ग्रा. १६, नेवासा ०६, पारनेर २५, पाथर्डी १७, राहाता १०, राहुरी २३, संगमनेर ४२, शेवगाव १२, श्रीगोंदा ०७, श्रीरामपुर ०६ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले २९, जामखेड २३, कर्जत ४१, कोपरगाव ४८, नगर ग्रा. ४३, नेवासा २७, पारनेर ५९, पाथर्डी ४८, राहाता ५९, राहुरी ३१, संगमनेर १०६, शेवगाव ६६, श्रीगोंदा ८०, श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१, इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,३०,७३६

उपचार सुरू असलेले रूग्ण:४८२६

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७८९

एकूण रूग्ण संख्या:३,४२,३५१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)