अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- एकीकडे राज्यात दिवाळीचा सन साजरा होत होता तर दुसरीकडे अहमदनगर रुग्णालयात आग दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राउत यांनी सामना अग्रलेखातून दोन्ही सरकारवर तोफ डागली आहे. अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयात आग लागून तब्बल अकरा जणांचा मृत्यू झाला.

यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. तसेच या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देखील आरोप – प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाल्या.

आता नुकतेच खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खासदार राऊत म्हणाले, “फक्त अश्रू ढाळू नका तर ठोस पावले काय उचलणार ते सांगा असा प्रश्न राउत यांनी दोन्ही सरकारला केला आहे”.

रुग्णालयात आग शोर्टसर्किटमुळे लागली असली तरी आरोग्य व्यवस्थेची ही होरपळ कोठेतरी थांबायला हवी. अर्थात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्रसरकार व राज्यसरकार या दोघांचीही जबाबदारी आहे.

सध्या मरण स्वस्त झाले आहे हे मान्य आहे पण इतके अमानुष व क्रूर असावे? सरकारने आता फक्त अश्रू ढाळू नयेत तर असे पुन्हा घडू नये यासाठी पुढे काय ठोस पावले उचलणार ते फक्त सांगा असा सवाल केंद्रसरकार व राज्यसरकारला विचारला आहे.