अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- करोना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पूर्वी 27 प्रवासी आले आहेत. त्यातील दोघांचा शोध लागलेला नाही. त्यातच आता पुन्हा 55 प्रवासी आले आहेत.

त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 82 आंतरराष्ट्रीय प्रवासी आल्याची नोंद झाली आहे. हे प्रवासी करोनाचे निर्बंध असलेल्या अतिजोखमीच्या देशातून आले आहेत.

त्यात दक्षिण अफ्रिका देशाचा देखील समावेश आहे. या प्रवाशांची माहिती स्थानिक प्रशासनाला आज प्राप्त झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी अहमदनगर जिल्ह्यात आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

आलेल्या 55 प्रवाशांमध्ये अहमदनगर शहरातील 13, श्रीरामपूर 10, कोपरगाव पाच, राहाता 10, अकोले तीन, राहुरी चार, नेवासे, संगमनेर प्रत्येकी तीन,

नगर तालुका दोन, तर कर्जत आणि शेवगावमध्ये प्रत्येकी एक प्रवासी आला आहे. या प्रवाशांची माहिती घेतली जात असून, जिल्ह्यातील तहसील पातळीवर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

अहमदनगरमध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वेसह दहा देशातून आलेल्या नागरिकांचा समावेश

जिल्ह्यामध्ये जे 55 प्रवासी आले आहेत, त्यामध्ये अमेरिका (युएस) मधून 13, इंग्लंड (युके) 3, युनायटेड अरब अरमाती (युएई) 5, साऊदी अरब 4, मालदीव 4, ऑस्ट्रेलिया 7, जपान 1, ओमान 17, जर्मनी 1 व झिम्बाब्वे येथून 1 जण आला आहे.

जिल्ह्यात आलेल्या 55 प्रवाशांपैकी 13 जण अहमदनगर महापालिक हद्दीतील आहेत. त्यामध्ये युएई, मालदिव, युएस, ओमान, ऑस्ट्रेलिया येथून प्रवास करून आलेल्यांचा समावेश आहे. नोकरी निमित्त तर काहीजण फिरण्यासाठी परदेशात गेले होते.

दरम्यान, ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली असली तरी दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत (आजचे 55 प्रवासी सोडून) परदेशातून नगर शहरात आलेल्यांपैकी कोणाचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतिष राजुरकर यांनी ही माहिती दिली.