file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या शनिवारी लागलेल्या आग प्रकरणी पोलिसांनी एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना अटक केली आहे.

या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या आगीत ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी कर्मचारी आणि अधिकारी दोषी असल्याचा ठपका ठेवला होता. याप्रकरणात चार जणांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

शुक्रवारी पुन्हा एका अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. अॅड. महेश तवले, विक्रम शिंदे,

नीलेश देशमुख यांनी आरोपींच्या मुख्य न्यायदंडाधिकारी तिवारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. दाखल केलेल्या गुन्ह्यात प्रथम ३०४ (अ) कलम लावण्यात आले होते, नंतर ते बदलून दुसऱ्या दिवशी ३०४ कलम लावण्यात आले.

तसेच यामधील ज्या परिचारिका आहेत त्या स्वच्छेने कामावर आल्या होत्या. त्यांचे या प्रकरणात कोणताही अपघात घडवण्याचा हेतू नव्हता, अशी बाजू मांडली.