Ahmednagar News :- ट्रॅव्हल्स बसची धडक बसल्याने 13 वर्ष वयाचा मुलाचा मृत्यू झाला. अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर शहरातील गजराजनगर भागात हा अपघात झाला.

आयान अब्दुल शेख (वय 13 रा. गजराजनगर) असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल रहीस शेख (वय 45) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक पंढरी बारकाजी मुसळे (रा. मालघीनगर, नागपूर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयान शेख हा अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग ओलांडत होता. त्याला ट्रॅव्हल्स बसची जोराची धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस नाईक गणेश कावरे करीत आहेत.