आधी झाडाला बांधून बेदम मारहाण केली नंतर तो मेला समजून रस्त्याच्या कडेला…. ? नगर मधील घटना

Ahmednagar News : नगरमध्ये नवनागापूर येथे अल्पवयीन मुलांची अर्धनग्न धिंड काढत बेदम मारहाण केल्याची घटना जाती असतानाच सारसनगर येथे एकाला झाडाला बांधून बेदम मारहाण करून बेशुद्ध झालेल्या एकास रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

काम पाहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीस चोर समजून पाच ते सहा जणांनी झाडाला बांधून जबर मारहाण केली. या मारहाणीत तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हि घटना सारसनगर परिसरात मंगळवारी घडली. राजेश भोस असे या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक केली आहे.

नगर शहरातील सारसनगर परिसरात असलेल्या औसरकर मळा या भागात काम पाहण्यासाठी राजेश भोस हे या भागात गेले होते. मात्र त्यांना चोर समजून या भागातील पाच जणांनी पकडून झाडाला बांधून ठेवले व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली.

या मारहाणीत राजेश भोस हे बेशुद्ध पडले होते. दरम्यान मारहाण करणाऱ्यांना तो मेला असे समजून त्याला रस्ताच्या कडेला फेकून दिले होते. याप्रकरणी पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकने अटक केली आहे.दरम्यान जखमी असलेले राजेश भोस यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

कालच अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांची धिंड काढल्याची धक्कादायक घटना नवनागापूर परिसरात घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या जबाबावरुन १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच दुसर्‍या फिर्यादीत चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी तीघा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe