अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- घोडेगाव तलावावरून उचल पाण्याच्या परवानग्या जलसंपदा खात्याने दिलेल्या आहेत. या तलावाखाली शेतकर्यांनी 700 एकर ऊस केलेला आहे. मात्र मार्च- एप्रिल 2020 मध्ये झालेल्या आवर्तनाच्या वेळी शेतकरी पाणी पट्टी भरण्यास तयार असताना घोडेगाव तलावात पाणी सोडले नाही.
त्यामुळे सातशे एकर ऊस अडचणीत आला असून, या ऊसाचे सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे, अशी खंत कुकडी कृती समितीचे निमंत्रक प्रा. तुकाराम दरेकर यांनी व्यक्त केली आहे. दि.14 मार्च ते दि.25 एप्रिल 2020 अखेर 42 दिवसाच्या आवर्तनामध्ये 1008 हेक्टर पिक क्षेत्र असणार्या कराळा तालुक्याला 470 द.ल.घ.फूट पाणी दिले.
16 हजार 370 हेक्टर पिक क्षेत्र असणार्या कर्जत तालुक्याला 1 हजार 87 द.ल.घ.फुट आणि 16 हजार 769 हेक्टर पिक क्षेत्र असणार्या श्रीगोंदे तालुक्याला 664 द.ल.घ.फुट पाणी दिलेले आहे. पिकक्षेत्र प्रमाणाच्या तुलनेत श्रीगोंदा तालुक्याला 500 द.ल.घ.फुट पाणी कमी मिळालेले आहे.
त्यामुळे वितरिका क्रमांक 10,11,12,13 व 14 ला पाणी मिळाले नाही. पारगाव, लेंडी नाला, औटेवाडी आणि घोडेगाव तलावाला पाणी मिळाले नाही. घोडेगाव तलाव कोरडा पडला असून, उन्हाळी आवर्तनामध्ये या तलावाला प्राधान्याने पाणी द्यावे, अशी मागणी प्रा. दरेकर यांनी केली आहे.
जून 2020 मध्ये सुटणार्या आवर्तनासाठी 4 टी.एम.सी. पाण्याची तरतूद केलेली असताना, घोड नदीवरील 25, मीना नदीवरील 24 आणि कुकडी नदीवरील 18 असे एकूण 67 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे कुकडी लाभ क्षेत्रात मोडत नसताना त्यांना 2 टी.एम. सी. पाणी देण्यात आले आहे.
त्यामुळे कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाला 2 टी.एम.सी. पाणी शिल्लक राहते. एवढ्या पाण्यात 1400 क्युसेक्सने 17 दिवस कालवा चालणार आहे. कालव्याच्या मुखापासून पायथ्यापर्यंत पाणी येण्यासाठी 7 दिवस लागतात आणि 847 द.ल. घ.फुट पाणी खर्ची पडते.
उरतात 10 दिवस आणि 1153 द.ल.घ.फुट पाणी एवढ्या पाण्यात जलसंपदा विभाग नेमके काय नियोजन करणार आहे? याचा खुलास त्यांनी करावा. 6 जून ला आवर्तन सुटण्याचा गवगवा फुसका असल्याचा आरोपही प्रा. दरेकर यांनी केला आहे. घोडेगावचे ऊस वाचविण्यासाठी त्या तलावात तातडीने 100 द.ल.घ.फुट पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews