‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा 11 वा बळी, ‘इतके’ बाधित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. तालुक्यात 25 ऑगस्ट रोजी तब्बल 41 म्हणजेच सर्वाधिक बाधित रुग्ण (आजपर्यंतच्या एकदिवसीय आकडेवारीनुसार) अकोले तालुक्यात आढळून आले.

काल तालुक्यातील धुमाळवाडी येथील 69 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील हा 11 वा बळी ठरला आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 511 वर जाऊन पोहचली आहे.

त्यापैकी 382 व्यक्ती उपचार करून बरे होऊन घरी परतले आहेत. तर 118 व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात खासगी व अ‍ॅन्टीजेन मिळून एकूण 8 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर खानापूर कोव्हिड सेंटर येथे काल 35 व्यक्तींचे स्वॅब घेऊन अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आज शनिवारी सायंकाळपर्यंत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24