अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सुपे औद्योगिक वसाहतीमधील इपिटॉनपाठोपाठ पी. जी. कंपनीत तब्बल १४ कोरोना रूग्ण आढळले. औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा समूह संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सोमवारी सायंकाळपर्यंत तालुक्यात २२ रूग्ण आढळले. पारनेर शहर व टाकळी ढोकेश्वरमधील रूग्णांची संख्या अनुक्रमे दहा व सात झाली. सोशल डिस्टन्सिंग पाळून शासनाने परवानगी दिल्यानंतर कारखाने सुरू झाले.
सुरूवातीस इपीटॉन कंपनीत एक रूग्ण आढळला. त्यापाठोपाठ इतर कर्मचारीही बाधित आढळले. मात्र, त्यांनी गावीच उपचार घेतल्यामुळे कंपनीत आढळलेल्या बाधितांची संख्या दोन सांगितली जाते.
दरम्यान, रविवारी पी जी कंपनीत १३, तर सोमवारी एक कामगार बाधित झाला. कर्मचारी सुपे गावात ज्या इमारतीत वास्तव्यास होते, तो परिसर कन्टेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
शहरात रविवारी रात्री रूग्ण आढळला. त्यापूर्वी किराणा व्यावसायिक व त्याच्या पत्नीस बाधा झाली होती. सोमवारी सात जणांना बाधा झाल्याचा अहवाल आला.
सात रूग्णांत वीटभट्टी व्यावसायिक व त्याची पत्नी, रविवारी रात्री आढळून आलेल्या वृद्धाच्या घरातील व्यक्तींचा समावेश आहे. टाकळीढोकेश्वर येथे सोमवारी पाच रूग्ण आढळले. तेथील रूग्णांची संख्या ७ झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com