ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने १४ ऊसतोड मजूर जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- इंडिकाने हुलकावणी दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटून १४ ऊसतोड मजूर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर गुंजाळवाडीत घडली.

धांदरफळ येथून ऊसतोड करून ट्रॅक्टर ट्रॉली ऊस घेऊन कारखान्याकडे चालली होता. जखमींत दत्तू गिरे, कविता गिरे, सीता गिरे,

संगीता गिरे, सुगंधा कतोरे, गोलम गिऱ्हे, रुपमा गिरे, छकुली गिरे, सविता गिरे, गीता गिरे, करिना गिरे, रविना गिरे, गणेश कातोरे आदींचा समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24