नगर पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्ग ६१ (जुना २२२) वरील अहमदनगर ते खरवंडी कासार या १०.६५ किमी पर्यंतचा खराब झालेल्या रस्त्याच्या कामासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ (जुना२२२) वरील मेहकरी ते फुंटेटाकळी येथील ५२ किलो मीटर लांबीच्या टप्प्यातील रस्त्याचे कामापैकी ५२ किमीच्या रस्त्यापैकी १०.६५ किमी रस्त्याचे काम खराब झाले होते.
दरम्यान या कामासाठी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी १६ कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत. सदर कामासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे देखील खासदार सुजय विखेंनी स्पष्ट केले.