अहमदनगर बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील 1997 वीज ग्राहक झाले विज थकबाकीतून मुक्त; अभय योजना ठरत आहे वरदान, काय आहे नेमकी ही योजना?

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितले तर प्रचंड प्रमाणात वाढलेली विजेची थकबाकी हा एक गंभीर प्रश्न असून यातून बाहेर निघण्यासाठी महावितरणाने अनेक उपाययोजना केलेले आहेत. त्यातीलच एक उपाय योजना जर आपण बघितली तर थकीत वीज बिल ग्राहकांसाठी महावितरणच्या माध्यमातून अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे.

ही एक महत्वपूर्ण योजना असून महावितरणच्या माध्यमातून ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी कापण्यात आलेले आहे अशांकरिता ही योजना नक्कीच वरदान ठरणारी आहे. अभय योजनेचा लाभ जर घेतला तर थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारांमध्ये सूट देण्यात येते. या योजनेचा लाभ अहिल्यानगर मंडळातील 1917 लघुदाब ग्राहकांनी घेतला असून त्यांची थकबाकीतून मुक्ती झाली आहे.

अहिल्यानगर मंडळातील १९१७ वीज ग्राहकांची वीज थककबाकीतून मुक्तता
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महावितरणच्या माध्यमातून कायमस्वरूपी वीज कनेक्शन कट केलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे व या योजनेच्या माध्यमातून जर ग्राहकाने थकबाकी एकरकमी भरली तर त्या थकबाकी वर आकारण्यात आलेले व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ अहिल्यानगर मंडळातील एकूण 1917 ग्राहकांनी घेतला असून या ग्राहकांनी सुमारे एक कोटी 68 लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीतून कायमची मुक्तता मिळवली आहे.

कसे आहे या योजनेचे स्वरूप?
या योजनेचे स्वरूप बघितले तर 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी विजपुरवठा खंडित झालेल्या म्हणजेच पिडी घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना फायद्याची आहे. थकीत बिलाच्या योजनेत कृषी ग्राहकांचा मात्र यामध्ये समावेश नाही.

या योजनेत वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे. विज बिलाचा वाद न्यायप्रविष्ठ असलेल्या पिडी ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तीवर लाभ घेता येणार आहे.

यामध्ये मूळ बिलाच्या 30% रक्कम भरून उर्वरित 70% रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळते.जे घरगुती,व्यावसायिक आधी लघुदाब ग्राहक एकरकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्च दाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत नाही.

संबंधित वीज ग्राहकांना महावितरणच्या वेबसाईटवरून तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपवरून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याकरिता वीज ग्राहक 1912 किंवा 1800-2333435/18002123435 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून आणि महावितरण कार्यालयात संपर्क करून माहिती घेता येणार आहे.

पुन्हा घेता येईल वीज कनेक्शन
या योजनेनुसार जर पैसे भरले तर त्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येणार आहे.त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याची सुविधा देखील असणार आहे.

यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांना वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे.तसेच थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी अभय योजना आहे.

Ajay Patil