राज्यातील विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग तुकड्या व शाळांना महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले.

२० टक्के अनुदान सुरू असून पुढील टप्पाही मंजूर करण्यात आल्याची माहिती नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून २०१४ साली अनुदानासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुदान मंजूर केले होते.

मात्र भाजप सरकार सत्तेवर येताच अनेक जाचक अटी लादून अनुदान रखडवले. यासाठी वित्त मंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सहकार्य केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आमदार एकनाथ शिंदे, अमित देशमुख, डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे

, दत्तात्रय सावंत, बळीराम पाटील, सतीश चव्हाण, श्रीकांत देशपांडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल सर्व शिक्षक संघटना, विनाअनुदानित कर्मचारी संघटनांनी अभिनंदन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24