अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-वेगवेगळ्या दोन घटनेमधून कत्तलीसाठी चालवलेल्या २३ गोवंशाची सुटका गोरक्षक व पोलिसांच्या संतर्कतेमुळे कारण्यात्यक्ष आले. हे सर्व गोवंश शहाजापूरच्या माऊली कृपा गोशाळेत आणण्यात आली.
पहिल्या घनतेमध्ये पारनेर तालुक्यातील सुपा येथील दौलत पेट्रोल पंपाजवळ बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी जनावरांची वाहतूक केली जात असल्याची
माहिती गुप्त बातमीदारांकडून सुपा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन ६८ हजार रूपये किंमतीचे एकूण १२ जनावरे ताब्यात घेतली.
याबाबत सुपा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल आर. एस. पटेल यांच्या फिर्यादीवरून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये नगरमधून ११ जनावरांची जनावरे नगर येथून सोडून आणली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com