Ahmednagar News : राहुरी, नगर, पाथर्डी तालुक्यांतील रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राहुरी नगर- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राहुरी, पाथर्डी व नगर तालुक्यांतील विविध रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकात दिली.

राहुरी मतदारसंघातील अत्यंत महत्वाच्या विविध रस्त्यांच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील रस्त्यासाठी ५ कोटी ५० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यात प्र. रा.मा. ८ ते कोळेवाडी ते रा.मा. ५२ रस्ता (प्रजिमा) किमी ५.३० ते १०.५०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, २ कोटी रुपये,

वांबोरी कुक्कडवेढे उंबरे – केंदळ मानोरी रस्ता ( प्रजिमा १५६) किमी ०.० ते ७ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २ कोटी रुपये, रा.मा. ५२ ते घोडेगाव- मोरे चिंचोरे कात्रड रस्ता (प्रजिमा ३५) किमी ११.३० ते १२.८००, ११.८००, ११.९०० ते १३.९००, १४.४०० ते १४.९०० रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १.५० कोटी रुपये एकूण ५.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाथर्डी तालुक्यातील रस्ते, वृद्धेश्वर घाटशिरस, देवराई, त्रिभुवनवाडी, लोहसर,

मिरी, आडगाव रस्ता (प्रजिमा १६३) किमी १० ते २० रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी रुपये, मोहोज ते चिंचोडी रस्ता (प्रजिमा ४५ ) किमी ३५ ते ४१.२०० रस्ता सुधारणा करणे १ कोटी २० लाख रुपये, खोसपुरी – शिराळ चिंचोडी- करंजी रस्ता (प्रजिमा ४४) १८ ते २२.९०० रस्ता सुधारणा करणे २ कोटी रुपये, वृद्धेश्वर,

घाटशिरस, देवराई, त्रिभुवनवाडी, लोहसार, मिरी, आडगाव (प्रजिमा १६३ ) किमी ० ते ५ सुधारणा करणे २ कोटी रुपये, पांढरीचा पूल, मिरी, शेवगाव रस्ता (रामा ५२ ) किमी २३ ते ३३ रस्ता सुधारणा करणे २ कोटी रुपये असे एकूण ९ कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.

राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघासाठी पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर आगडगाव ते कोल्हार रस्ता प्रजिमा ४९ सुधारणा करणे रक्कम ७ कोटी,

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी – वडगाव रस्ता पिंपळगाव उज्जैनी प्रजिमा १९० सुधारणा करणे रक्कम ३ कोटी ३० लाख असे नगर तालुक्यासाठी १० कोटी ३० लाख रुपयची तरतूद वरील रस्त्यासाठी करण्यात आल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.