पारनेर तालुक्यातील ‘ह्या’ रस्त्यांसाठी २५ कोटी मंजूर – आ. निलेश लंके

Published by
Ahmednagarlive24 Office

राज्य शासनाच्या नियोजन विभागातील रोजगार हमी योजना प्रभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील ३६ गावांमधील १०५ किलोमिटर अंतराच्या रस्त्यांसाठी २५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली.

विविध गावांमधील शेतकऱ्यांकडून शिव पाणंद रस्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद योजनेंतर्गत विविध गावांतील रस्त्यांसाठी नियोजन विभागाच्या रोजगार हमी योजना प्रभागाकडे पाठपुरावा करून जिल्ह्यात सर्वाधिक निधी मंजूर करण्यात यश आल्याचे आ. लंके यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील मुंगशी, निघोज, पळशी, भाळवणी, लोणीमावळा, भोयरे गांगर्डा, वडगाव सावताळ / गाजदीपुर, म्हसोबा झाप, सावरगाव काळेवाडी, ढोकी, तिखोल, ढवळपुरी, सांगवी सुर्या, कळस, टाकळीढोकेश्वर,

रांधे, वाडेगव्हाण, करंदी, हत्तलखिंडी, बाबुर्डी, काताळवेढे, कान्हूरपठार, वाळवणे, हंगा, हिवरे झरे, वाकोडी, खडकी, पिंपळगांव कौडा, भोयरे पठार, निमगांव वाघा, चास भोरवाडी, भोरवाडी, शिंगवे नाईक, या गावांतील कामांना मंजुरी मिळाली आहे.

Ahmednagarlive24 Office