कोरोनामुळे वादग्रस्त ठरलेले 29 तबलिगी मायदेशी रवाना ; मंत्री थोरातांचे मानले आभार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   कोरोनामुळे वादग्रस्त ठरलेले तबलिगी जमातीचे २९ नागरिक मायदेशी परतले. जाताना त्यांनी मंत्री थोरात बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले. नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर हे नागरिक आढळून आले.

अनेकांना तुरुंगात रहावे लागले. न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून नगर, जामखेड व नेवासे येथे इंडोनेशिया,

फ्रान्स, मलेशिया, साऊथ आफ्रिका आदी देशांतील तबलिगी जमातीतील नागरिक अडकून पडले होते. त्यांचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले होते.

त्यामुळे त्यांना मायदेशी जाता येत नव्हते. संगमनेरचे रऊफ बेग यांनी या संदर्भात मंत्री थोरात यांची भेट घेतली. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख

यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला. जिल्हा पोलिसप्रमुख अखिलेशकुमार सिंह यांना सर्वांचे पासपोर्ट देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर ते मायदेशी परतले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24