अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील प्रतापपुरातील रामदास लक्ष्मण आंधळे यांच्या वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या ठार केल्या. जवळपास ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.
मानमोडे बाबा मंदिराजवळ आंधळे वस्तीत शेळ्यांचा गोठा आहे. मध्यरात्री शेळ्या ओरडण्याचा आवाज आल्याने आंधळेंनी गोठ्याकडे धाव घेतली. ३ शेळ्यांचा बिबट्याने फडशा पडला.
गोठा बंदिस्त असतानाही छोट्या जागेतून बिबट्याने आतमध्ये प्रवेश केला. आंधळेंचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने त्यांना अर्थिक मदत द्यावी. या ठिकाणी पिजंरा लावुन बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved