अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : कुकडीतून १ मार्चपासून ३८ दिवसाचे आवर्तन ! परंतु पाणीसाठा किती आहे शिल्लक? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कुकडी प्रकल्प लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली आहे. आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती.

त्यामुळे आता या प्रकल्पातून १ मार्चपासून ३८ दिवसांसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुकडी कालवा सल्लागार समितीची शनिवारी (दि. २४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पुण्यात पार पडली होती.

तर पिंपळगाव जोगा धरण्याच्या पाण्याचे आवर्तन २६ तारखेपासून सुरु केले जाणार असून ते ४० दिवसांचे असणार आहे.

बैठकीला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, आ. राम शिंदे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सध्या कुकडी प्रकल्पात १५.९३० टीएमसी म्हणजेच ५३.६५ टक्के पाणी शिल्लक आहे.

सध्या पाणीसाठा फारच कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची देखील चणचण भासण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पूर्व भागातील नगर जिल्ह्यातील कर्जत,

पारनेर, तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, शिरूर, तसेच जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील जनतेला पाणी फारच जपून वापरावे लागणार आहे.

जलसंपदा विभाग कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर म्हणाले, कुकडी सध्या पाण्याचा साठा अवघा ५३.६५ टक्के इतकाच आहे.

चार महिने जपून वापरावे लागणार आहे. कालव्यांची दुर्दशा पाहायला मिळत आहे. त्यातच वाढते ऊन व पाणी गळतीचा फटका मोठ्या प्रमाणात बसण्याचीही शक्यता आहे. कुकडी प्रकल्पातील कालव्यांची दुर्दशा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

अनेक ठिकाणी अस्तरीकरण निघालेले आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील विशेषतः कांद्याचे पिक पाण्याअभावी जळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आ. नीलेश लंके यांची भेट घेऊन कुकडी तसेच पिंपळगांजोगा कालव्याचे आवर्तन लवकर सोडण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेऊन आ. लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.

  • किती आहे पाणीसाठा शिल्लक
    डिंभे ६५.१४ टक्के (८.१३९ टीएमसी), येडगाव ५९.७४ टक्के (१.६१ टीएमसी), माणिकडोह ३८.८३ टक्के (३.९५ टिएमसी), वडज ६४.६८ टक्के (०.७६० टिएमसी) आणि पिंपळगाव जोगा ४९.१२ टक्के (१.१९१ टीएमसी).
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office