अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षणाची सोडत काढण्यात आली. ३८ ग्रामपंचायतींमध्ये स्रीयांना आरक्षण लागू झाले.
अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती ६, नागरिकांचा मागास प्रवर्ग १०, खुला प्रवर्ग १७ आहे. अनुसूचित जाती राखीव – शिंगणापूर, मंजूर, माहेगाव देवी, डाऊच बुद्रूक, कारवाडी. अनुसूचित जाती स्री राखीव – तिळवणी, माहेगाव देशमुख, कोकमठाण, चासनळी, मढी खुर्द. अनुसूचित जमाती – रवंदे, कासली, दहेगाव बोलका, जेऊर-कुंभारी, कान्हेगाव.
अनुसूचित जमाती स्री राखीव – देर्डे-कोर्हाळे, शहाजापूर, पोहेगाव बुद्रूक- पोहेगांव खुर्द, ओगदी, वेस-सोयगाव, येसगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग – सांगवीभुसार, कोळगाव थंडी, हंडेवाडी, करंजी बुद्रूक, अंचलगाव, मुर्शतपूर, लौकी, देर्डे-चांदवड, मनेगाव, चांदेकसारे, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्रीयांकरिता राखीव – मोर्विस, कोळपेवाडी, चांदगव्हाण, आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, सडे, डाऊच खुर्द,
शहापूर, रांजणगाव देशमुख. सर्वसाधारण – धामोरी, ब्राम्हणगाव, टाकळी, मढी बुद्रूक, बहादरपूर, घारी, काकडी-मल्हारवाडी, वडगाव, नाटेगाव, धोत्रे, धोंडेवाडी, सोनारी, हिंगणी, खिर्डी गणेश, शिरसगाव, सावळगाव, भोजडे, बोलकी. सर्वसाधारण स्री राखीव – मळेगाव थडी, कुंभारी, सुरेगाव, वेळापूर, बक्तरपूर, धारणगाव, जेऊर पाटोदा, उक्कडगाव, पढेगाव, तळेगाव मळे, वारी, खोपडी, सोनेवाडी, बहादराबाद, जवळके, संवत्सर अंजनापूर.