अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : चोरट्यांच्या मारहाणीत एका महिलेसह ४ जण जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : तालुक्यातील चोऱ्या व दरोड्याचे सत्र सुरूच असून, रविवारी पहाटे आखेगाव येथे चोरट्यांनी २ ठिकाणी मारहाण करीत चोरी केली व २ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला.

या घटनेत एका महिलेसह ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आखेगाव व परिसरात भीतीचे वातावरण आहे.

रविवारी पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास आखेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे राहणारे अभय राधाकिसन पायघन हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना त्यांच्या घरात ३ चोरट्यांनी प्रवेश केला.

त्यांच्या आई मंगल पायघन यांना झोपेतून जाग आल्याने त्या किंचाळल्या, त्यावेळी चोरटयांनी त्यांना आरडाओरडा करू नकोस, नाहीतर इथच मारून टाकीन, अशी धमकी देत हातातील शास्त्राने डोळ्याजवळ मारहाण करून जखमी केले. त्याचवेळी वडील राधाकिसन पायघन यांनीदेखील विरोध केला असता,

त्यांनाही लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. या वेळी चोरटयांनी किचनच्या डब्यात ठेवलेले १० हजार रुपये काढून घेतले. आरडाओरडा झाल्यामुळे चोरटयांनी घरातून काढता पाय घेतला, त्यांचा पाठलाग करीत अभय पायघन हे त्यांच्या मागे धावले असता, चोरटयांनी त्यांच्या दिशेने दगड फेकून मारला,

तो त्यांच्या कपाळावर लागला. चोरटयांनी डोक्याला फडके बांधलेले होते. त्यानंतर चोरटयांनी गावातील सोमठाणा रोडवर शेतवस्तीत राहणारे रामकिसन पांडू काटे यांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केली, या मारहाणीत त्यांचा हात फॅक्चर झाला,

त्यांच्या येथून ४० हजार रुपये चोरले. सुशीला काटे यांनी त्यांचे पती रामकिसन काटे यांना मारहाण करताना पाहिल्यावर आरडाओरड सुरू केली; परंतु चोरटयांनी त्यांना गप्प बसण्यास सांगितले. या वेळी त्यांच्या शेजारी असणारे भाऊसाहेब काटे मदतीला आले असता,

त्यांना चोरटयांनी दगड फेकून मारल्याने ते ओरडले, त्यानंतर शेजारी राहणारे ज्ञानेश्वर पालवे यांना जाग आली असता, ते बाहेर येताच चोरटयांनी त्यांच्यावरदेखील दगडफेक केली ; परंतु त्यांनी गच्चीतून उडी मारून मोकळ्या रानात पळाले.

त्यानंतर चोरटयांनी नितीन पायघन यांच्या रिकाम्या खोलीचा दरवाजा उघडून बघितले, त्यानंतर ते पसार झाले. सरथाबाई गोर्डे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न झाला.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलीसांशी संपर्क केला. श्वान व ठसे तजांचे पथक घटनास्थळी आणले होते. अभय राधाकिसन पायघन यांच्या फिर्यादीनुसार तीन अज्ञात व्यक्तींविरोधात जबरी चोरी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक सरोदे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office