अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात ४० जनावरांचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : लम्पी आजाराने पाथर्डी तालुक्यातील चाळीस जनावरांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात सुमारे १५० जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. लम्पी आजाराने पशुधन मरत असताना शेतकऱ्यांमध्ये अजुनही लम्पीबाबात जागृती होणे गरजेचे आहे.

अनेक ठिकाणी उपचाराची कमतरता, इतर जनावरांची घ्यावी लागणारी काळजी, औषध फवारणी, सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होणारे उपचार, आजारी जनावरांची ईनोंदणी करणे आदी बाबींची शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पाथर्डी शहरात मोकाट सोडलेल्या गायींना लम्पी आजाराने घेरले आहे. रस्त्यावर उपचाराविना रक्ताळलेल्या जखमा घेऊन फिरणारी जनावरे मन सुन्न करुन सोडतात. जनावरांचे मालक घरी बिनधास्त बसतात. अशा जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. मोकाट जनावरांना पकडूना ठेवण्याची व्यवस्था पालिकेकडेदेखील नाही.

त्यांची चारापी व देखभाल कोण करणार, असा प्रश्न आहे. तालुक्यातील हाकेवाडी, हंडाळवाडी, कसबापेठ, रावसाहेब म्हस्के कॉलनी, संत वामनभाऊनगर, नवीपेठ, आखरभाग, अंजठा चौक, बाजारतळ, वसंतराव नाईक चौक, अशा विविध ठिकाणी लम्मीने आजारी असलेली जनावरे हिंडत आहेत.

लम्पीने आजारी पडलेल्या जनावरांबाबत माहिती तालुका पशुधन विभागाला द्यावी. लम्पी झालेल्या जनावरांचा उपचार शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच करुन घ्यावा. आजारी जनावरांची ऑनलाईन नोंदणी महत्वाची आ

जनावरे मयत झाली तर त्याची माहिती पशुधन विकास अधिकाऱ्यांना दिली जावी. शेतकऱ्यांनी आजाराची काळजी घेतली पाहिजे. आजारी जनावरे इतर जनावरांपासून दूर बांधली पाहिजेत. गोठा व परिसर फवारणी महत्वाची आहे.

ही आपत्ती शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारी आहे – डॉ. जगदिश पालवे, गटविकास अधिकारी, पाथर्डी.

हाकेवाडी येथील कडुबाळ दगडू चितळकर यांची गाय लम्पीनी मयत झाली. गायीला झालेल्या मरणयातना पाहुन हतबल होवुन चितळकर यांनी उपचारासाठी प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले.

मात्र, तरीही गायीचे प्राण वाचले नाहीत. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेले पशुधन समोर मरते आहे, अशा यातना कोणाच्या नशीबाला येऊ नयेत, असे गणेश चितळकर यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office