अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- घरासमोर उभी असलेल्या ४० वर्षीय महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हि घटना राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण येथे २७ ऑक्टोबर रोजी घडली असून इब्राहिम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेतील ४० वर्षीय महिला ही दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजे दरम्यान तिच्या घरासमोर उभी होती. त्यावेळी तेथे आरोपी इब्राहिम दादाभाई शेख राहणार पिंपरी वळण ता. राहुरी. हा तेथे आला.
त्याने सदर महिलेला पाठीमागून कवळ मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सदर महिलेने तिच्या नातेवाईकांसह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून इब्राहिम दादाभाई शेख याच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.