अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-महापालिकेने मालमत्ता करावर ची शास्ती माफी दिल्यामुळे नागरिकांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणावर आपले मालमत्ता कर जमा केले आहेत. यामुळे आज अखेर मनपाच्या तिजोरीत 42 कोटी रुपये जमा झाले आहेत.
ज्या नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी पाहून करोनाच्या भीतीने आत्तापर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही, त्या नागरिकांसाठी महापालिकेने मुदत वाढवून दिली आहे. मनपा प्रशासनाकडे एकीकडे शास्तीमाफी योजनेस मुदतवाढ दिली असली, तरी एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
एक लाखाच्या पुढे थकीत रक्कम असलेले हे थकबाकीदार आहेत. कोरोना संकटामुळे मनपाची संकलित कराची वसुली झाली नव्हती. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत केवळ 13 कोटींची वसुली झाली होती. मनपा तिजोरीत खडखडाट असल्याने विकासकामांवर परिणाम झाला होता.
त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत शास्तीमाफीची मागणी केली होती. मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शास्तीमाफीचा निर्णय घेत नोव्हेंबर महिन्यात 75 टक्के शास्तीमाफी जाहीर केली. नोव्हेंबरपर्यंत 41 कोटींची वसुली झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved