अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 (क) पोटनिवडणूकीसाठी एकुण 44.61 टक्के मतदान झाले. उद्या (बुधवार) सकाळी नऊ वाजता जुने महापालिका कार्यालय येथे मतमोजनी होणार आहे.(AMC News)
महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे सुरेश तिवारी, भाजपचे प्रदीप परदेशी यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. मनसेचे पोपट पाथरे यांच्यासह अपक्ष उमेदवार ऋषिकेश गुंडला, अजय साळवे, संदीप वाघमारे निवडणूक रिंगणात आहे.
वादग्रस्त श्रीपाद छिंदम याचे पद रद्द झाल्यानंतर या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. मंगळवारी सहा केंद्रांमध्ये शांततेत मतदान पार पडले. दुपारपर्यंत 16 टक्के मतदान झाले होते.
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकुण 44.61 टक्के मतदान झाले. मतदानासाठी येणार्या मतदारांना माहिती देण्यासाठी सर्वच उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर बूथ लावले होते. मतदान केंद्रावर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तोफखाना पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.