दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर नाशिक, घोटी, इगतपूरी व धरण कार्यक्षेत्रात २४ तासात ४९५ मिलिमीटर म्हणजेच २० इंच दमदार पाऊस पडल्याने दारणा, गंगापूर धरणे ८६ टक्के भरले आहे.
दारणा धरणात ८६.५४ टक्के पाणीसाठा झाला तर भाम, भावली धरणे पुर्णपणे भरले आहे. ६४ दिवसात नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतून जायकवाडीकडे ७४ हजार ७९३ क्युसेक्स म्हणजेच ६ टीएमसी पाणी वाहुन गेले आहे.
वारणेतून काल रविवारी (दि.४) गोदावरी नदीत ४६ हजार पेक्षा जास्त क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले होते. हे पाणी रात्रीपर्यंत ६० हजार क्यूसेक्स होण्याची चिन्हे आहेत. सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यंदा पहिल्यादाच गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे अनेकांनी या पाण्याची पूजन केले. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने धाव्याची घरे शेजावली आहे. तर रस्ते गटारी स्वच्छ धुऊन गेले आहेत.
विविध प्रभागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून चिखलाचे दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डासांचे साम्राज्य वाढले आहे. (दि.३) ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे मिलीमिटरमध्ये तर कंसातील आकडे एकुण पावसाचे आहेत.
दारणा ९२ (७३०), मुकणे ८८ (८११), वाकी १५७ (१३७६), भाम १५५ (१८९७), भावली २६२ (२५०९), वालदेवी ५२ (५२२), गंगापूर ९८ (८९२), काश्यपी ८७ (८०५), गौतमी १११ (९१४), कडवा ६४ (४२१), आळंदी ६० (५१६), पालखेड १३ (१८८), करंजवण १४० (६१८), ओझरखेड ५२ (४४२), वाघाड ५८ (४९७), नांदूर मध्यमेश्वर २२ (१८९), नाशिक ७२ (४९८), घोटी ० (९९८), इगतपूरी २४० (१८४६), त्र्यंबकेश्वर १६१ (१३२०), देवगाव १५ (२९०), ब्राम्हणगाव ८ (२९६), कोपरगाव १४ (२४२), पढेगाव ० (२२८), सोमठाणे (२०९), कोळगाव २१ (२६९), सोनेवाडी १३ (१८६), शिर्डी १३ (२६४), राहाता ११ (१९९), रांजणगाव खुर्द ११ (२२५), चितळी ० (२०८), याप्रमाणे पाऊस झाला आहे.
धरणातील पाणीसाठा टक्के, तर कंसातील आकडे उपलब्ध पाणी दशलक्ष घनफुटमध्ये पुढीलप्रमाणे दारणा ८६ टक्के (६१८७ दलघफु), मुकणे ४७ टक्के (३४०४) वाकी ६२ टक्के (१५४६), भाम १०० टक्के (२४६४), भावली १०० टक्के, (१४३४), वालदेवी ९७ टक्के (११०८), गंगापूर ८० टक्के (४५४४), काश्यपी ४४ टक्के (६८२८), गौतमी ७७ टक्के (१४५२), कडवा ८९ टवके (१५१७), आळंदी ५५ टक्के (४५१), पालखेड ७६ टक्के (४९९), करंजवण ३७ टक्के, (२०१२), असा पाणीसाठा आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात शनिवारी रात्रभर भिज पाऊस सुरू होता. चालू रब्बी हंगामात दारणा, गंगापूर धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्याने बारमही गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून रब्बी पिकाला त्याचा फायदा होणार आहे.
गेल्या दोन महिन्यात कोपरगाव तालुक्यात पावसाने ओढ दिली. असल्यामुळे धरणे भरतील की नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र शनिवारी धरण कार्यक्षेत्रात पावसाने चांगल्या प्रमाणात पुन्हा आगमन झाल्याने धरणे तुडुंब भरले आहे.