अहमदनगर बातम्या

कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करावा; आमदार काळेंचे पालकमंत्र्यांना साकडं

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत सन २०२ -२२ मध्ये कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

दरम्यान नुकतेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विविध समस्या मांडल्या.

त्याचबरोबर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत सन २०२ -२२ मध्ये कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करण्यात यावा अशी आग्रही मागणी देखील केली.

कोपरगाव नगरपरिषदेचे एकूण ५ प्रभाग हे एससी. एसटी. या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १,७,८,१० व १४ या प्रभागांचा समावेश आहे.

तसेच त्या व्यतिरिक्त कोपरगाव शहरात देखील एससी. एसटी. प्रवर्गातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या नागरिकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करावा अशी मागणी काळे यांनी केली.

Ahmednagarlive24 Office