अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत असल्याची चिन्हे असतानाच सोमवारी (दि.७) १०४ कोरोनाबाधित आढळून आले असून, एकाच दिवसात ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण कायम असल्याचे दिसते. आतापर्यंत ७० हजार ८३३ रुग्ण बरे होऊन परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९८ टक्के इतके आहे.

रविवारी कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार १०८ इतकी होती. सोमवारी सायंकाळी ही संख्या १ हजार ११३ इतकी झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी ७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, रविवारी सायंकाळी सहापासून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत रूग्ण संख्येत १०४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजारा ९१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६३ आणि अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३, नगर ग्रामीण २, पारनेर ७, पाथर्डी ६, संगमनेर १, श्रीगोंदा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले १, कोपरगाव ७, नगर ग्रामीण १०, नेवासा १, पारनेर ८, राहाता ७, संगमनेर ६, शेवगाव ३, श्रीरामपूर ३,

कॅन्टोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत २१ जण बाधित आढळून आले.मनपा २, कोपरगाव ५, नगर ग्रामीण १, नेवासा ४, राहाता ५ आणि श्रीरामपूर ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २२, जामखेड १, कर्जत ५, कोपरगाव २, नगर ग्रामीण ९, पारनेर १, पाथर्डी ५, राहाता १३, राहुरी १,

संगमनेर ४, शेवगाव १, श्रीगोंदा ८, श्रीरामपूर २ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण ७३ हजार ३७ इतकी झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24