महिलेच्या पाकिटातून रोख रक्कमेसह ५ तोळे लांबविले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात चोरट्याने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पाकिटातील साडेतीन हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तोळे असा १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना बुधवारी दुपारी घारगाव ते संगमनेर दरम्यान घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोनाली संजय पवार (वय ४७, रा. मनोहर कॉलनी, नाशिक) ही महिला बसमधून प्रवास करत होती. अज्ञात चोरट्याने या महिलेच्या पाकिटातील ६५ हजार रुपये किमतीचा २६ ग्रॅम वजनाचा राणी हार, ६२ हजार ५०० रुपये किमतीचा २५ ग्रॅम वजनाचा लक्ष्मी हार आणि १ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ व रोख रक्कम ३ हजार ५०० रुपये, असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे.

याबाबत सदर महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक लता जाधव करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe