अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : विद्यार्थ्यांच्या बसला अपघात ५० मुले बालंबाल बचावली

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे पर्यटनासाठी आलेल्या बसला अपघात झाला असून ५० विद्यार्थी या अपघातातून बालंबाल बचावले आहेत. ज्या ठिकाणी बस रस्त्याच्या खाली उतरली त्या ठिकाणी रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडलेले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटोत निसर्ग बहरला असुन या बहरलेल्या निसर्गाचा महिमा बघण्यासाठी रोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. शनिवारी भंडारदरा येथे कांदिवली येथील एका विद्यालयाच्या चार बसेस भंडारदरा पर्यटनासाठी आल्या होत्या.

यातील एक बस भंडारदरा कॉलनीच्या परिसरातून जात असताना अचानक रस्त्याच्या खाली उतरली. ही बस आणखी जास्त खाली उतरली असती, तर मोठ्या प्रमाणात बसमधील विद्यार्थी जखमी झाले असते. शिवाय काही फुटावरच बससमोर मोठे झाडही होते.

बस रस्त्याच्या कडेला टाकलेल्या भरावावरुन रस्त्याच्या खाली उतरली. बसमध्ये ५० विद्यार्थी व शिक्षक होते. बसला अपघात होताच स्थानिक तरुणांनी विद्यार्थ्यांना क्षणाचाही विलंब न लावता गाडीच्या खिडक्यांमधून बाहेर काढले.

ज्या ठिकाणी बस रस्त्याच्या खाली उतरली त्या ठिकाणी रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडलेले आहे. या रस्त्याचे काम २०१९ पासून सुरू असून सन २०२३ उजाडले तरी अजुनही अपुरेच आहे.

हे काम करणाऱ्या ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम खात्याची मेहबानी असून तालुक्याच्या आमदारांनी या पर्यटनस्थळावर तातडीने लक्ष घालून काम करुन घ्यावे, अशी मागणी भंडारदरा परीसरातून होऊ लागली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office