Ahmednagar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान येथील विकास कामासाठी व या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनांची पार्किंगच्या व्यवस्थेसाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.
श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानच्या विकास कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे यांनीदेखील पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
देवस्थान समितीने या विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थाने या देवस्थानच्या विविध विकास कामांसाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे खा. विखे पाटील यांनी सांगितले. या कामाचे भूमिपूजन वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, नगरसेवक नंदकुमार शेळके, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, युवानेते कुशल भापसे, ज्येष्ठनेते संभाजीराव वाघ, राजेंद्र तागड, राम चोथे, शरद पडोळे, शिवाजी डोंगरे यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त, घाटशिरसचे ग्रामस्थ उपस्थित होते.