अहमदनगर बातम्या

राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहाता राहाता तालुक्यातील १२ आमपंचायतीच्या सरपंचपदाचे १२ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सदस्यपदासाठी १४० जागेसाठी ३७३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पोटनिवडणुकीतील केलवडची एक जागा व पिंपळवाडीची एक जागा बिनविरोध झाली आहे.

या दोन्ही जागा विखे गटाला मिळाल्या आहेत. दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या सदस्यपद्याच्या सर्वच्या सर्व ९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र सरपंचासाठी तेथे उमेदवार रिंगणात आहेत. नरेगाव येथे एक जागा सदस्याची बिनविरोध झाली आहे.

पुणतांबा ग्रामपंचायतीत विखे, कोल्हे व काळे गटात तिरंगी लढत होत आहे. चितळीतही या तिघांच्या गटात तिरंगी लढत होत आहे. धनगरवाडीत विखे काळे गटाच्या युतीमध्ये दुरंगी लढत होत आहे. तर अन्य सर्व निवडणूकांमध्ये विखे समर्थकांच्या बोन व तीन गटात लढत होत आहे.

बुधवार रोजी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यापैकी ५६ उमेदवारांनी माघार घेतली तर सदस्यपदाचे २१३ उमेदवारांनी माघार घेतल्याने या निवडणूकीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले.

केलवड ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत विखे गटाच्या सुनिता रजपूत व पिंपळवाडीच्या पोटनिवडणूकीत लक्ष्मण सालपुरे हे बिनविरोध झाले आहेत. आडगाव ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

पुणतांब्यात सरपंच पदासाठी ६ तर सदस्यपदासाठी ५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणूकीत ना. राधाकृष्णन विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे या तीन गटात तिरंगी लढत होत आहे. १७ जागांसाठी ५५ उमेदवार तर सरपंचासाठी एक जागेसाठी ६ जण रिंगणात आहेत. या तिन्ही गटासह एक शिवसेना ठाकरे गट व दोन अपक्ष असे सहा उमेद्वार रिंगणात आहेत.

दहेगाव को. ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी तीन प्रभागातून १७ उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचदासाठी उमेदवार रिंगणात आहेत. २ या ग्रामपंयातीची एक सदस्यपदाची जागा बिनविरोध झाली आहे. या ग्रामपंचायतीत दुरंगी लढत होत आहे.

कोन्हाले ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी ५ प्रभागातून २९ उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचपदासाठी उमेदवार रिंगणात आहेत. विखे पाटील गटातच दुरंगी लढत होत आहे. निमगाव कोहळे ग्रामपंचातीच्या १३ जागांसाठी ५ प्रभागातून ३८ उमेदवार रिंगणात आहेत, तर सरपंचपदासाठी उमेदवार रिंगणात आहेत.

धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी ३ प्रभागातून १४ उमेदवार रिंगणात आहेत, तर दोन सरपंचपदासाठी उमेदवार रिंगणात आहेत. वाकडी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ६ प्रभागातून ५३ उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचपदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. स. ग्रामपंचायतीत १७ जागांसाठी ६ प्रभागातून ४५ उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचपदासाठी ६ जण रिंगणात आहेत.

पिंप्रीनिर्मळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या १३ जागांसाठी ५ प्रभागातून ३३ उमेदवार तर सरपंचपदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. कनकुरी ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी ३ प्रभागातून २८ दमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचपदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. चितळी ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी ५ प्रभागातून ३७ उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत.

Ahmednagarlive24 Office