अहमदनगर बातम्या

राहुरीतील २२ ग्रा.पं.च्या निवडणूकीत ५२८ उमेदवार रिंगणात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीतून सरपंचपदाच्या 161 अर्जापैकी 93 उमेदवारी अर्ज व सदस्यपदाच्या 901 अर्जापैकी 373 उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात सरपंच पदासाठी 68 तर सदस्य पदासाठी 528 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.

तसेच एक सरपंच व 26 सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. तसेच सदस्य पदाच्या पोट निवडणूकीच्या 9 उमेदवारी अर्जापैकी 6 अर्ज माघारी घेतल्याने 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

राहुरी तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 3 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी काल बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी राहुरी तहसील आवार गर्दीने फुलून गेला होता.

काल बुधवारी अर्ज माघारी घेण्यासाठी एकच दिवस असल्याने अर्ज माघारी घेण्यासाठी सर्वांची एकच धांदल उडाली होती.

तालुक्यातील पिंप्री वळण येथील सरपंच पदाची एकमेव जागा तसेच चिंचोली 1, पिंप्री वळण 9, घोरपडवाडी 1, दरडगाव 1, धामोरी बुद्रुक 1, धामोरी खुर्द 1, गंगापूर 1, ब्राम्हणी 1, माहेगाव 2, मुसळवाडी 2, शिलेगाव 7 या सदस्यपदाच्या 26 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर राहुरी खुर्द, पाथरे खुर्द व गुंजाळे या तीन ही ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीच्या 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office