अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे.
जिल्ह्यतील रुग्णवाढीबरोबरच राहुरी तालुक्यात काल सोमवारी करोनाची लाट पहायला मिळाली. गेल्या 24 तासात राहुरीत 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांसह प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
त्यात 22 महिलांचा समावेश आहे. गेल्या महिनाभरापासून तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण आणण्यास आरोग्य व महसूल प्रशासनाला अपयश आले आहे.
त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, तालुक्यात करोनाचे लसीकरण सुरू असून नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. काल राहुरी शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले.
शहरात 20 जणांना करोनाची बाधा झाली. राहुरी शहरासह तालुक्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील जनतेने करोनाचे सर्व नियम पाळून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर कायम करा, असे आवाहन करण्यात आले आहे.