धक्कदायक अहमदनगर शहरात या कारणातून ६ दुचाकी जाळल्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-   जुन्या भांडणाच्या रागातून सहा – सात जणांनी घरात घुसून तिघांना मारहाण केली. हा प्रकार निर्मलनगर परिसरातील शिरसाठमळ्यात मंगळवारी रात्री दहा वाजत घडला. याप्रकरणी ताेफखाना पाेलिसांनी एकाला अटक केली आहे.

दीपक सावंत असे आराेपीचे नाव असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. मारहाणीत अरुण ठाेकळ, मंदा ठाेकळ व विशाल ठाेकळ जखमी झाले.

मंदा ठाेकळ यांच्या फिर्यादीवरुन ताेफखाना पाेलिसांनी दीपक सावंत, तुषार थाेरवे व त्यांच्या पाच साथीदारांंच्या विराेधात गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री ठाेकळ यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम हाेता.

रात्री दहाच्या सुमारास आराेपी तेथे आले. जुन्या भांडणाच्या रागातून आराेपींनी ठाेकळ कुटुंबाला घरात घुसून मारहाण केली. घरातील सामानाची ताेडफोड करत घरासमाेर लावलेल्या सहा दुचाकी जाळल्या.

घटनेची माहिती मिळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. मुख्य आराेपी दीपक सावंत याला तत्काळ अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

अहमदनगर लाईव्ह 24