अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आतापर्यंत सुमारे ६ जण कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
असे असतानाही याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शासनांच्या नियमांसह दुर्लक्ष केले जात असून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्हा अधीक्षक कार्यालयात सुमारे ७० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
विविध बैठका घेताना कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याची चर्चा येथील कर्मचाऱ्यांत आहे. सध्या नगर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
नियमांकडे दुर्लक्ष केल्याने शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिका, जिल्हा परिषदेतही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामध्ये नगर तालुका कृषी कार्यालयात ३ जण कर्मचारी,
उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात २ जण, विस्तार शाखेमध्ये १ जण असे एकूण ६ जण कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी आढळले. असे असतानाही जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
त्यामुळे नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात कोराेनाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, याकडे कृषी अधीक्षकांनी लक्ष द्यावे,
अशी चर्चा दबक्या आवाजात कृषी अधिकारी कार्यालयाच्या वर्तुळात सुरू आहे. सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved