अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-अकोले तालुक्यात कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. कोरोनारुग्णांची संख्या जवळपास अर्धशतकाकडे वाटचाल करत आहे. काल (बुधवार) तालुक्यात 6 कोरोना रुग्ण आढळून आले.
त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 47 झाली आहे. त्यापैकी 37 जण कोरोनामुक्त झाले तर 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल रात्री उशिरा अहमदनगर
येथील शासकीय प्रयोगशाळेतून आलेल्याअहवालांत देवठाण येथील 80 वर्षीय महिलेचा अहवाल करोना पॅाझिटीव्ह आला असल्याची माहिती सकाळी अकोलेत प्राप्त झाली. सदर महिला पूर्वीच्या बाधित महिलेच्या संपर्कातील आहे.
तर काल बुधवारी दुपारी आलेल्या अहवालात तालुक्यातील पाच रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात भीतीचे वातावरण असून अकोलेकरांनी सात दिवसांसाठी अकोले शहर बंदही ठेवण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews