अहमदनगर बातम्या

मोटारसायकल अपघातात ७ जण जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे राहुरी मांजरी रस्त्यावर दोन मोटारसायकलच्या जोरदार धडकेत सात जण जबर जखमी झाले आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आरडगाव परिसरात रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. या अपघातात मानोरी येथील अक्षय आढाव, ऋतुराज काळे,

मयूर मोरे हे मानोरीकडे घराच्या दिशेने जात होते व कोंढवड येथील अजय बर्डे, किरण माळी, दोन लहान मुले हे राहुरीच्या दिशेने घरी जात असताना हा अपघात घडला आहे.

अपघाताची घटना समजताच गावातील सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील तरुण तातडीने मदतीला धावून आले. राहुरी येथील व देवळाली प्रवरा

येथील रुग्णवाहिका यांना तातडीने संपर्क करून जखमींना शिर्डी व नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office