Ahmednagar News : बेकादेशीररित्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करणाऱ्या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून ७०० किलो गोमांस व एक वाहन जप्त केल्याची घटना शहरातील मदिनानगर परिसरात नुकतीच घडली.
राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जात आहे. शहरातील मदिनानगर परिसरात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका पत्र्याच्या शेडमध्ये गोमास ठेवले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत समजली. ही माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कारवाई करण्याची सूचना केली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या ठिकाणी शेख शाहीद हफिज (रा. मदीनानगर, संगमनेर) याच्या पत्र्याचे शेडमध्ये तसेच इनोव्हा कार (क्र. एम. एच. ०४ डीजे ८१२९) मध्ये अवैधरित्या गोवंश जनावराचे कत्तल केलेले मांस आढळले.
पोलिसांनी या पत्र्याच्या शेड मधून २० हजार रुपये किंमतीचे १०० किलो गोमांस, इनोवा कार क्रमांक (एमएच ०४ डीजे ८१२९ ) मध्ये ६०० किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी शेख शाहीद हाफिज (रा. मदीनानगर), मुददसर अब्दुल एलीस हाजी कुरेशी (रा. भारतनगर) व मोहमंद साहील कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.