अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढू लागल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन केले होते. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. आता राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर आदेश देत शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांनुसार सोमवारपासून नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने 23 नोव्हेंबर रोजी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, नेवासा तालुक्यातील 72 शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.
या शाळांनी पालकांची बैठक आयोजित करून त्यांची भूमिका समजावून घेतली. तसेच त्यांच्याकडून संमतिपत्र भरून घेतले. त्यामुळे सोमवारीच किती विद्यार्थी शाळेत येतात, हे समजणार आहे. नेवासा तालुक्यातील या 72 शाळांनी वर्गांत फवारणी करत शाळांची रंगरंगोटी करून स्वच्छता केली आहे.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आदेशामध्ये शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे, वाहतूक सुविधांचे निर्जुंतुकीकरण करणे,
वर्ग खोली व स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतरच्या नियमांनुसार असावी, शाळेत दर्शनी भागात मार्गदर्शक सूचनांचा फलक लावावा, शिक्षक-पालकांच्या बैठका ऑनलाइन घ्याव्यात, यासह विविध सूचना केल्या असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved