अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- भाडे तत्वाने दिलेली खोली संबंधित भाडेकरू खाली करत नव्हता. त्याने अतिक्रमण केल्याने खोली मालक अनिल शिवाजी कदम (वय 73, रा. खांडगाव, ता. संगमनेर) यांनी प्रजासत्ताक दिनी संगमनेर तहसील कार्यालयासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत याबाबत अनिल शिवाजी कदम यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र वारंवार तक्रार करूनही पोलीस दखल घेत नव्हते. भाडेकरू कडून अनिल शिवाजी कदम यांना वारंवार त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान झाले होते.
न्याय मिळण्यासाठी त्यांनी प्रश्नाकडे निवेदने, तक्रारी अर्ज करून न्याय मिळण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासन दखल घेत नसल्याने आज सकाळी त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलीस कर्मचारी यांना कर्मचाऱ्यांनी कदम यांना वाचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात करण्यात आले आहे.