अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी जिल्ह्याला ७५ कोटी ८१ लाखांचा निधी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठवला होता.

या अतिवृष्टीत ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ७५ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

हा निधी तहसीलमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी सुचना केल्या. या वर्षीच्या पावसाने सर्व रेकॉर्ड मोडित काढले.

या पावसाने सप्टेंबरअखेरपर्यत जिल्ह्यात जवळपास ६४ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप तसेच बागायती पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने देखील १ लाख ६४ हजार १६० हेक्टर क्षेत्रास फटका बसला.

जून ते ऑक्टोबर पर्यंतच्या काळातील घरांची पडझड, जनावरांची जीवीतहानी, मनुष्यहानी, शेती क्षेत्राचे नुकसान तसेच पिकांचे नुकसान याच्या नुकसानीचा आहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पाठविला होता.

त्यानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी ७५ कोटी ८१ लाखांचा निधी मिळाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24