अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- नगरमधील झेंडीगेट येथील सध्या बंद असलेली दीपाली टॉकीज म्हणजे पूर्वीची सरोश टॉकीजवर २५ डिसेंबर १९४२ला स्वातंत्र्याच्या आदोलनात सरोष टॉकीज मध्ये इंग्रजांविरुद्ध आदोलनात क्रांतिकारकांनी बॉंम्ब टाकला, यामुळे इंग्रज हादरले होते. त्या घटनेला या २५ डिसेंबरला ७८ वर्ष पूर्ण होत आहेत.
१९४२ ला महात्मा गांधीच्या चले जाव चळवळीत मांगीलाल भंडारी यांच्यासह भिंगार मधील विणकर समाजातील महिला व पुरुष यांनी मोर्चा काढला होता. त्यावर लाठीहल्ला झाला व पंडितनेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल, श्री कृपलानी आदी नेते नगरच्या किल्ल्यात स्थानबद्ध झाल्याने आपण काही तरी देशाकरता करावे, हा विचार मनात उत्पन्न झाला.
त्यातून मग तरुणांनी भूमिगत होऊन संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे, जाळपोळी, असहकार करण्याचे काम भिंगार व नगर मध्ये सुरु केले. एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डीनरी फॅक्टरीमधून बॉम्ब चोरला व तो एका महिलेने पोटावर बॉम्ब ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून बसने भिंगारला आणला.
त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले, हबीब खान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. ब्रिटीशाची गर्दी सरोष टॉकीजवर जास्त असते म्हणून ती निवडण्यात आली २५ डिसेंबरला रात्रीचा चॉकलेट सोल्जर या चित्रपटाचे शोला तिकीट काढून हबीब खान व रत्नम पिल्ले गेले.,मध्यतरात सर्वे केला गेला कोठे ब्रिटिश जास्त आहेत व रात्री ११ वा पिल्लेंनी इशारा केला व हबीबखान यांनी बॉम्ब टाकला.
यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मेले व अनेक जखमी झाले खान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ऍम्ब्युलन्स मधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले त्यामुळे कोणाला संशय आला नाही. त्यावेळेच्या गुजरात-महराष्ट्र व मुबई इलाख्याचा पहिला बॉम्बस्फोट हा झाला नंतर पुणे व इतर ठिकाणी ही मालिका सुरु झाली या घटनेची दाखल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती.
त्यावेळच्या रेडिओ वर शाबास इंडिया असे उदगार काढले होते. या घटनेचा काही केल्या ब्रिटिशाना तपास लागेना ,कोणी केला हेच समजेना त्यानी सर्व गोष्टीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली यातील खोमणे हे इंदोरला निघून गेले व बाकीचे सर्व भिंगारमध्येच राहिले,खोमणे यांनी नगरमधील मित्राला पत्र पाठवले होते. त्यामध्ये याचा उल्लेख होता इंग्रजांनी हे पत्र फोडून वाचले त्यामुळे या चौघांना अटक झाली व फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.