अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-महापालिकेच्या स्थायी समितीमधून ८ सदस्य ३१ जानेवारीला निवृत्त होतील. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी महासभा बोलावण्याचा प्रस्ताव नगरसचिव एस. बी. तडवी यांनी महापाैरांना दिला आहे.
स्थायी समितीत वर्णी लावण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नगरसेवक मुदस्सर शेख, सुभाष लोंढे, सोनाली चितळे, आशा कराळे, गणेश भोसले, सुवर्णा जाधव, योगीराज गाडे, कुमार वाकळे निवृत्त होणार आहेत.
पक्षीय संख्येनुसार शिवसेनेचे ३, भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ व बसपाचा एक सदस्य निवृत्त होईल. गटनेत्यांमार्फत शिफारस केल्यानंतर महापाैर नवीन सदस्यांची निवड घोषित करतील.