अहमदनगर बातम्या

Ahmednagar News | संगमनेरातील बँकेची 82 लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युवरसह २३ जणांवर गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

शहरातील जी. एस. महानगर को. ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये गोल्ड व्हॅल्यूअरच्या माध्यमातून ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. यापुढे आणखी किती बँकांचे घोटाळे समोर येतील हे लवकर उघड होईल.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गोल्ड व्हॅल्युबरसह २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई येथील जी. एस. महानगर को. ऑपरेटिव्ह बँकेची संगमनेरमध्ये शाखा आहे.

१ जुलै २०१६ पासून जगदीश शहाणे हा बँकेत गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून काम पाहत आहे. शहाणे यांनी सोनेतारण करणाऱ्या कर्जदारांच्या सोन्याची शुद्धता तपासणी करून त्या संदर्भात ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सोनेतारण कर्ज दिले जाते.

कर्जदाराकडे सोने खोटे निघाल्यास त्यास गोल्ड व्हॅल्यूअर आणि कर्जदार जबाबदार असतो. दरम्यान गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्या विरोधात सोनेतारण कर्ज प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती माध्यमांमधून बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांना समजली होती.

त्यामुळे शिंदे यांनी याची माहिती तातडीने आपल्या बँकेच्या मुख्य शाखेला दिली. बँकेच्या व्यवस्थापनाने गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्यासह सोनेतारण कर्जदारांना नोटीसा पाठवून दागिन्यांची तपासणी करण्यासाठी बँकेत हजर राहण्यास कळविले होते.

या तपासणीमध्ये २३ कर्जदारांचे सोने बनावट असल्याचे आढळून आले. या कर्जदारांनी बँकेची ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सदर बँकेत खोट्या सोन्याचा माध्यमातून २३ कर्जदारांनी बँकेची ८२ लाख ५७ हजार ८३४ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात केली.

याप्रकरणी गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्यासह २३ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेची फसवणूक करणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश लक्ष्मण शहाणे, राजेश केशवराव नेवासकर, शशिकला विश्‍वनाथ पवार, शरद मारुती पर्बत, महेश रामचंद्र जोशी, मुकुंद मुरलीधर उपरे, योगेश शंकर सुर्यवंशी,

संदिप नंदलाल काळंगे, आयुब= उस्मान पठाण, नवनाथ भरत घोडेकर, नाजीम अब्दुलमान शेख, रविंद्र रमेश राजगुरू, सचिन मनलभाऊ होलम, अनिल राजाराम पावबाके, ज्ञानेश्‍वर त्रंबक पगारे, राजेंद्र काशिनाथ वाकचौरे, प्रतिक नानासाहेब केरे, विजय भास्कर अवचिते, रामभाऊ भावका पुणेकर, विशाल काशिनाथ वाकचौरे, उषा शिवाजी दुधवडे, वैभव प्रकाश वाकचौरे, राजेश विश्‍वनाथ पवार, अशी आहेत.

Ahmednagarlive24 Office