अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी निवडणूक या होणारच आहे.
त्यातच श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने सर्वपक्षीय लोकसेवा महाविकास आघाडीचे 9 जागांसाठी 9 च उमेदवारी अर्ज राहिल्याने अखेर निवडणूक बिनविरोध झाली.
दरम्यान नऊ सदस्य संख्या असलेली खानापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लोकसेवा, महाविकास आघाडी स्थापन करण्यात येऊन सर्वपक्षीय नऊच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित झालेले असताना,
दोन उमेदवारी अर्ज अचानक दाखल झाल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र दि. 4 रोजी म्हणजेच अर्ज माघारीचे दिवशी अंतीम टप्प्यात दोन उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने 9 जागांसाठी नऊच उमेदवारी अर्ज राहील्याने निवडणूक अधिकार्यांनी निवडणूक बिनविरोध घोषीत केली.
नवनिर्वाचित सदस्य दत्तात्रय रामचंद्र आदिक, मिना वाल्मिक आदिक, रावसाहेब कडू पवार, योगीता गोविंद आदिक , संगीता संजय बर्डे, भाऊसाहेब बाबुराव जगताप, ज्ञानदेव चांगदेव आदिक, रेवती अमोल आदिक, ज्योती सुर्यकांत जगताप असे आहेत.